NZ vs AUS: कर्णधाराच्या गळ्यात पडून मैदानात ढसाढसा रडू लागला मॅक्सवेल...पाहा व्हिडीओ
. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला आहे.
दुबई: टी 20 वर्ल्ड कप 2021 वर ऑस्ट्रेलिया संघाने आपलं नाव कोरलं आहे. किवी संघाला 8 विकेट्सने पराभूत करून कांगारू संघाने हा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला आहे. त्यामुळे हा होणारा आनंद वेगळाच आहे. टी 20 वर्ल्ड कप 2021 साठी जगाला एक नवा चॅम्पियन मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक केलं. त्याने 38 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये 77 धावा केल्या आहेत. वॉर्नर आणि मार्शच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टी-20 विजेतेपद पटकावले.
विजय मिळताच खेळाडू मार्शकडे धावत गेले. त्याला घट्ट मिठी मारली हा क्षण खूप भावुक करणारा होता. ग्लेन मॅक्सवेल विजयानंतर भावुक झाला. त्याने कर्णधार फिंचला मिठी मारली आणि त्याच्या अश्रूला बांध फुटला. आयसीसीने या सेलिब्रेशनचा व्हिडीओही शेअर केला.
मिचेल मार्शने 50 चेंडूमध्ये 77 धावा केल्या. वॉर्नरने अर्धशतक केलं तर मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये 28 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने न्यूझीलंडवर विजय मिळवत टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्यानंतर खेळाडूही खूप भावुक झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.