पर्थ : टी-20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केलाय. वर्ल्डकपमधील हा मोठा उलटफेर मानला जातोय. या सामन्यात पाकिस्तानचा अवघ्या एका रन्सने पराभव झाला आहे. पाकिस्तानचा या स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. यामुळे पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग अजूनच खडतर झाला आहे.
 
पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाव्बेने पाकिस्तानला 131 रन्सचं टारगेट दिलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना 129 पर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 11 रन्सची आवश्यकता होती. मात्र अवघे 9 रन्स करता आल्याने पाकिस्तानचा पराभव झालाय.


पाकिस्तानचे फलंदाज पुन्हा फ्लॉप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसली. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम 9 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स करू शकला, तर मोहम्मद रिझवानने 16 बॉल्ममध्ये 14 रन्स करू शकला. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 रन्स केले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 रन्सचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. दुसरीकडे झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने ३ विकेट्स घेतलेत.


शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना


पर्थच्या मैदानावर रंगलेला हा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात अखेर झिम्बाब्वेने बाजी मारली. पहिल्यांदा फलंदाजी करत झिम्बाब्वेने 8 विकेट्स गमावत 130 रन्स केले. तर 131 रन्सचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही 8 विकेट्स गमावत 129 रन्स केले.