T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलियात (Australia) सुरुवात झाली आहे. पात्रता फेरीत अनेक उलटफेर पाहिला मिळतायत. पण क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या (India vs Pakistan) व्हाय व्होल्टेज सामन्याची. येत्या रविवारी म्हणजे 23 ऑक्टोबरला भारत आणि पकिस्तान क्रिकेट संघ आमने सामने येतील. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची प्लेईंग इलेव्हन (Team India Playing XI) कशी असणार याची उत्सुकता भारतीय क्रिकेटप्रेंमीना लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराव सामन्यात विजयी सुरुवात
भारताच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सराव सामना खेळला गेला. मोहम्मद शमीची (Mohammed Shami) भेदक गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. पण या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. टीम इंडियातल्या स्टार खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं होतं.


ऋषभ पंतला संधी नाही
पहिल्या सराव सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतला (Rishab Pant) संधी देण्यात आली नव्हती. पंतला बाहेर बसवल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) मिम्सचा (Memes) पाऊस पडलाय. क्रिकेट चाहत्यांनी टीम मॅनेजमेंटला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही जणांनी ऋषभ पंतला वॉटरबॉय (Water Boy) म्हटलं आहे. एकाने पंतसाठी वाईट वाटत असल्याचं लिहिलंय. तर एका चाहत्याने छल हुआ है हमारे साथ असं म्हणत ऋषभ पंतचा फोटो शेअर केला आहे. ऋषभ पंतला सराव सामन्यात तरी संधी द्यायला हवी होती, असं काही जणांचं म्हणणं आहे. 


ऋषभ पंतचा सूर हरवला?
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर दोन अनऑफिशील सराव सामने खेळली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दोन्ही सामन्यात ऋषभ पंतला सलामीला पाठवण्यात आलंहोतं. पण दोन्ही मॅचमध्ये ऋषभ फ्लॉप ठरला. पंतने दोन्ही सामन्यात प्रत्येकी 9 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही.