T20 World Cup : टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; बुमराह, अर्शदीपनंतर आणखी एक गोलंदाज जखमी!
रोहित शर्माचं टेन्शन वाढलं....
Deepak Chahar : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठे धक्के बसल्याचं पहायला मिळत आहे. आगामी वर्ल्डकपपूर्वी आधी टीम इंडियाची लिटमस टेस्ट पार पडत आहे. भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये खेळल्या (IND vs SA ODI) जाणाऱ्या वनडे मालिकेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. आधीच भारताचा स्टार गोलंदाज बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर पडलाय. त्यानंतर आता भारताचा आणखी एक स्टाईक बॉलर जखमी असल्याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय.
बुमराहच्या जागेवर अद्याप कोणताही खेळाडूला रिप्लेस करण्यात आलेलं नाही. दीपक चहर (Deepak Chahar) आणि मोहम्मद शमीची (Mohammed Shami) नावं चर्चेत होती. मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सध्या तो संघाचा भाग नाही. त्यामुळे दीपक चहर लवकर ऑस्ट्रेलियाची फ्लाईट पकडेल, अशी शक्यता होती. मात्र, आता दीपक चहर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
दीपक चहरची (Deepak Chahar) दुखापत गंभीर स्वरूपाची आहे की नाही, यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) दुखापतीचं ग्रहण लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला धक्क्यावर धक्के बसले आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असल्याने भारतीय गोलंदाजी कमकूवत झाली आहे. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील संघाबाहेर असणार आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
आणखी वाचा - T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाचा दिग्ग्ज होणार 'आऊट'