T20 World Cup 2024 Scheduled : आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक ((T20 World Cup Scheduled) जाहीर करण्यात आलं आहे. . यावर्षी जून महिन्यात टी20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून वेस्ट इंडिज आणि अमिरेकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 जूनपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत वीस संघ खेळणार असून पाच संघांचे प्रत्येकी चार ग्रुप करण्यात आले आहेत. ग्रुप A मध्ये भारतासह, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका संघाचा समावेश करण्यात आला आहे. वेस्टइंडिजमध्ये 2010 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. तर अमेरिकेत पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाचं आयोजन होणआर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचे सामने
आयसीसी टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला (India vs Pakistan) खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 12 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध खेळला जाणार आहे. पहिले तीनही सामने न्यूयॉर्कमधले खेळवले जाणार आहेत. 


असे आहेत ग्रुप
ए, बी, सी आणि डी असे चार ग्रुप करण्यात आले आहेत. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनाडा, आणि अमेरिका संघांचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान या संघांचा समावेश आहे. ग्रुप सी मध्ये न्यूझीलंड, वेस्टइंडिज, अफगाणिस्तान, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी संघांचा समावेश आहे. तर ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. 


असा आहे स्पर्धेचा फॉर्मेट
टी20 विश्वचषकाची सुरुवात 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. यजमान अमेरिका आणि कॅनाडादरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. ग्रुप स्टेजमधले सर्व सामने 1 ते 18 जूनदरम्यान होतील. त्यानंतर सुपर 8 चे सामने 19 ते 24 जूनदरम्यान खेळवले जातील.  26 आणि 27 जूनला सेमीफायनलचे सामने रंगतील. तर 29 जूनला टी20 विश्वचषकाचा विजेता संघ जाहीर होईल. 


12 संघांचा थेट प्रवेश
यंदाच्या टी20 स्पर्धेत बारा संघांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. यात भारतासह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड संघांचा समावेश आहे. तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका यजमान संघ असल्याने त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे.


8 संघांनी केलं क्वालिफाय
तर आठ संघांनी क्वालिफाय राऊंडमधून प्रवेश केला आहे. यात आयर्लंड, स्कॉकलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनाडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा या संघांचा समावेश आहे.