Phil Salt record in T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमधील सुपर-8 साखळीतील पहिल्यात सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला आहे. इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज फिल साल्टने 47 चेंडूत नाबाद 87 धावा ठोकत मैदानात अक्षरश: धुमाकूळ घालत विजयात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फंलदाजी करताना 4 विकेट गमावत 180 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 17.3 ओव्हर्समध्येच हे टार्गेट पूर्ण केलं. इंग्लंडने फक्त दोन गडी गमावत वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला. विजयात इंग्लंडच्या गोलंदाजांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी एकूण 51 डॉट चेंडू टाकले. जोफ्रा आर्चरने 34 धावा आणि आदिल रशीदने 21 धावा देत प्रत्येक एक विकेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर 8 मधीस दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा (ENG vs WI) ओपनर फिल साल्टने (Philip Salt) आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. फिल साल्टने 47 चेंडूत 87 धावा ठोकताना 7 चौकार आणि 5 षटकार लगावले. साल्टने तब्बल 184 च्या स्ट्राइक रेटने धावा करत मैदानात वादळ आणलं होतं. 


साल्टने रोमारियो शेफर्डच्या एका ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊसच पाडला. रोमारियो शेफर्डने टाकलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये साल्टने 30 धावा ठोकल्या आणि सामना एकतर्फी करुन टाकला. याचं कारण 16 व्या ओव्हरला इंग्लंडला विजयासाठी 30 धावात 40 धावांची गरज होती. फिल साल्टच्या तुफान खेळीमुळे हे टार्गेट 24 चेंडूत 10 धावांवर गेलं. फिल साल्टने 16  व्या ओव्हरमध्ये 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 


फिल साल्ट याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने 26 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी 18 व्या ओव्हरमध्येच संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने हा सामना 8 गडी राखून जिंकला. फिल साल्टला आपल्या जबरदस्त खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. साल्टने यावेळी अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. 


फिल साल्ट कोणत्याही विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा इंग्लंडचा फलंदाज ठरला आहे. साल्टने T20I मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 32 षटकार मारले आहेत. याशिवाय ENG vs WI T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. साल्टने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 9 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात एकूण 478 धावा केल्या आहेत. याशिवाय सॉल्ट टी-20 डब्ल्यूसीमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.


इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंड संघाने 180 धावा केल्या. ब्रेंडन किंग 13 चेंडूत 23 धावा करून निवृत्त झाला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर जोनाथन चार्ल्सने 38 आणि निकोलस पुरनने 36 धावा केल्या. कर्णधार पॉवेलने 17 चेंडूत 36 धावा केल्या. रोमारियो शेपर्डने 15 चेंडूत 28 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात इंग्लंडने फक्त दो विकेट गमावत लक्ष्य गाठलं. साल्टने 47 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 87 धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 25 आणि मोईन अलीने 13 धावा केल्या.