मुंबई : टी -20 वर्ल्ड कप आता काहीच दिवसातच सुरू होणार आहे. आयसीसीचा हा मेगा इव्हेंट यूएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी -20 वर्ल्ड कपमधील भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध असणार आहे, अशा स्थितीत भारताचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी यांना एक चांगला संघ मैदानात उतरवायचा आहे आणि त्याच्यासाठी ते खूप चर्चा देखील करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन याने म्हटले आहे की, कदाचित धोनी हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना शार्दुल ठाकूर याला टी -20 वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात समाविष्ट करुन घेण्याची ऑफर देऊ शकतो.


धोनी या खेळाडूला टी -20 वर्ल्ड कपसाठी तिकीट देण्याची शक्यता


शार्दुल ठाकूर सध्या टी -20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग तर आहे, परुंतु तो राखीव खेळाडूंच्या यादीत आहे. मायकल वॉन म्हणाला की, शार्दुल ठाकूर टी -20 टी -20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासाठी एक मोठे शस्त्र ठरू शकतो.


हार्दिक पंड्या आधीच दुखापतीशी झुंज देत असताना, मायकेल वॉनचा असा विश्वास आहे की शार्दुल ठाकूरला टी 20 वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात समाविष्ट केल्यास संघाचा फायदा होईल. क्रिकबझसोबत झालेल्या मुलाखतीत मायकेल वॉन म्हणाला, "आयसीसी टी -20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक स्टंपच्या मागे उभे असतो आणि सगळं काही पाहात असतो. परंतु आता वेळ आली आहे की, त्याने विराट आणि शास्त्रीला सांगावे लागेल की, आता वेळ आली आहे.


मायकेल वॉनने एक मोठे विधान केले


वॉनने शार्दुल ठाकूरची तुलना इंग्लंडचा दिग्गज खेळाडू इयान बोथमशी केली आणि म्हटले की हा खेळाडू असाच बनू शकतो. तो म्हणाला की शार्दुल ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, तो नेहमी फलंदाजांना चकमा देतो. तो सतत त्याची गोलंदाजी आणि वेग बदलतो, ज्यामुळे त्याच्या बॉलवर फलंदाजांना खेळणे कठीण होत आहे.


महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि सध्या ते फक्त CSK चे कर्णधारपद घेताना दिसत आहे. यानंतर धोनीला क्रिकेट चाहते आयसीसी टी -20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे मार्गदर्शक म्हणून पाहतील.