T20 World Cup: टीम इंडियाच्या T20 स्कॉडवर माजी निवडकर्त्यांचीच टीका
`या` चार खेळाडूंना T20 स्कॉडमध्ये स्थान देण्याची होतेय मागणी, तुम्हाला काय वाटतं?
मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. टीम इंडियाचे अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर पडले आहेत. त्यात आता टीम इंडियाच्या टी20 स्कॉडवर (T20 World Cup Squad) टीका होऊ लागली आहे. तसेच या चार खेळाडूंना संघात स्थान देण्याची मागणी होतेय. त्यामुळे नेमकी ही टीका कोणी केलीय? व खेळाडू कोण आहेत,ते जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) आणि अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) यांना दुखापत झाली आहे.त्यामुळे ते टीम इंडियाच्या (Team India) टी20 स्कॉडमधून बाहेर पडले आहेत. या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच टेन्शन वाढलं आहे. त्यात आता टीम इंडियाच्या टी20 स्कॉडवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी टी20 स्कॉडमध्ये काही बदल सुचवले आहेत. त्यांच्या मते या चार खेळाडूंना टीम इंडियाच्या टी20 स्कॉडमध्ये (T20 World Cup Squad) संधी मिळायला हवी होती. हे खेळाडू कोण आहेत? व या खेळाडूंना घेऊन त्यांच मत काय आहे,ते जाणून घेऊयात.
श्रेयस अय्यर-मोहम्मद शमी
श्रेयस अय्यरही चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याला संधी मिळालेली नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत सहभागी आहे. दीपक हुडाच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे तर मोहम्मद शमीचा (mohammad shami) अहवाल कोविड निगेटिव्ह आला असून त्यानंतर तो संघात परतण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल
शुभमन गिलचाही (shubhman gill) या संघात असायला हवे. तो सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उमरान मलिक
उमरान मलिकबाबत (umran malik) वेंगसरकर म्हणाले की, त्याला आशिया कपमध्येही संधी मिळायला हवी होती. त्याचा असा विश्वास आहे की "दुबईमध्ये जिथे विकेटमध्ये गवत नाही आणि विकेट फक्त सपाट आहे, तिथे तुम्हाला एका वेगवान गोलंदाजाची गरज आहे जो फलंदाजांना फसवू शकेल, असे वेंगसकर यांचे म्हणणे आहे. मात्र त्याला आशिया कपमध्ये संधी देण्यात आली आहे.
मी वेगासाठी उमरान मलिकची (umran malik) निवड करेन. तो 150 किमी/तास वेगाने गोलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्याला आताच संधी दिली पाहिजे. त्याचा वेग 130 किमी/ताशी पोहोचल्यावर त्याला संघात घेऊन काहीच फायदा होणार आहे.
दरम्यान याआधीही वेंगसरकर यांनी टी-20 वर्ल्डकप संघाबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आणि संघ निवड झाल्यानंतर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता समर्थन केले पाहिजे, असे म्हटले होते.