T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) सध्या टप्प्याटप्प्यानं पुढे जाताना दिसत आहे. असं असतानाच संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर यानं पुन्हा एकदा लक्षवेधी प्रतिक्रिया देत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. विराट कोहली (Virat Kohli) आणि (Rohit Sharma) रोहित शर्मापेक्षाही महत्त्वाचा खेळाडू कोण, या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही कदाचित दोन मिनिटं विचार कराल. पण, गौतमला या प्रश्नाचं उत्तर माहितीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीर (Gautam Gambhir)च्या मते टी20 फॉर्ममधील जगातला सर्वात अग्रस्थानी असणारा खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा अप्रतिम प्रदर्शन करत आहे. टी20 मध्ये सूर्यकुमार बहुमूल्य खेळाडू असल्याची प्रतिक्रियाही त्यानं दिली. 


काय म्हणाला गंभीर? 


'त्याच्याकडे (सूर्यकुमारकरडे) भलेही भारतीय संघातील इतर खेळाडूंप्रमाणे कवर ड्राईव्ह नसेल, तर त्याच्याकडे 180 चा स्ट्राईक रेट आहे जो इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत कमाल आहे', असं गंभीर म्हणाला. सूर्याची एकंदर कामगिरी पाहता सध्या त्याला किमान सध्यातरी 360 डिग्री असं नाव त्याला देऊ नये, असं म्हणत त्यानं अद्यापही बऱ्याच गोष्टी शिकल्याही पाहिजेत ही बाब त्यानं अधोरेखित केली. 


वाचा : Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...


सूर्याकडे असणारं क्रिकेटचं (Cricket) कौशल्य, त्याच्या खेळण्याची पद्धत पाहता त्याला आपण नेमकं काय करत आहोत याची कल्पना आहे. त्याच्याकडे ओपन स्टांस आहे असं म्हणत गंभीरनं या खेळाडूच्या कौशल्याची प्रशंसा केली. प्रथम श्रेणी (First Class) क्रिकेटमध्ये त्यानं केलेली कामगिरी पाहता त्याला कसोटी क्रिकेटमध्येही संधी देण्यात यावी यासाठी तो आग्रही दिसला. 


एक झलक सूर्यकुमारच्या तळपत्या कामगिरीवर 


विराट आणि रोहित त्यांच्या परीनं दमदार कामगिरी करत आहेतच. पण, त्यातही गंभीरनं मात्र सूर्यकुमारच्याच नावाला प्राधान्य देत पुढच्या काळासाठीसुद्धा तो एक खंबीर खेळाडू म्हणून समोर येईल अशी आशा त्यानं व्यक्त केली. 


सध्याच्या घडीला टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारतीय संघाच्या वतीनं सर्वाधिक धावा करणाचा सूर्यकुमार दुसरा फलंदाज (Batsman) ठरत आहे. त्यानं या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 54.66 च्या सरासरीनं 164 धावा केल्या आहेत. 18.21 चा स्ट्राईक रेट (Strike Rate) असणाऱ्या सूर्यानं 2 अर्धशतकी खेळी आपल्या नावे केल्या आहेत. त्यामुळं नाही म्हटलं तरी तो रोहित आणि विराटला टक्कर देतोय हे नक्की!