T20 World Cup: टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानी संघात 3 मोठे बदल
दुहेरी शतक झळकवणाऱ्या खेळाडूला पाकिस्तानच्या टीममध्ये संधी, टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानचा मास्टरप्लॅन
नवी दिल्ली: आयपीएलचे सामने सध्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना यावेळी होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी 20 वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघात 3 मोठे बदल केले आहेत. या स्पर्धेसाठी फखर जमानला 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाकिस्तानचा एकमेव खेळाडू आहे.
पहिल्यांदा फरख जमानचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र आता त्याला 15 सदस्यांच्या टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय माजी कर्णधार सरफराज अहमद आणि हैदर अली यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे.
टी 20 वर्ल्ड कपचे सामने 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आझम खानच्या जागी संघात सरफराज अहमदला संधी देण्यात आली आहे. तर दुसरा मोठा बदल म्हणजे खुशदिल शाह आता राखीव खेळाडू म्हणून असणार आहे.
सोहैब मसूदला दुखापत झाली होती. मात्र मेडिकल टीमशी बोलणं झाल्यानंतर त्याचं संघातील स्थान कायम ठेवण्यात आलं आहे. तर दिग्गज खेळाडू शोएब मलिक आपलं स्थान टीममध्ये टिकवण्यात अपयशी झाला आहे. दुसरीकडे एका व्यावसायिकाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला ऑफर दिली आहे. टीम इंडियाला पराभूत केल्यास कोरा चेक पाकिस्तान क्रिकेट बोर्डला उद्योजक देणार आहे.
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आसिफ अली, सोहैब मसूद, सरफराज अहमद (विकेटकीपर), हैदर अली, फखर जमान, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन अफरीदी, हॅरिस रौफ, हसन अली, इमाद वसीम.
रिजर्व खेळाडू: उस्मान कादीर, शाहनवाज दहानी, खुशदिल शाह