वो लम्हे, वो यादे... जेव्हा टीम इंडिया पहिल्यांदा चॅम्पियन झाली असा झाला होता जल्लोष
Team India celebrate ICC World Cup wins : तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. वर्ल्ड चॅम्पियन संघाचं मायदेशात आगमन झालं असून दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
Team India celebration in 1983 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं जेतेपद पटकावत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत चार वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली आहे. सर्वात पहिल्यांदा 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिली टी20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची कमाल टीम इंडियाने केली होती. तर 20011 मध्ये माहिच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा एकदिवसीय वर्ल्ड कपवर नाव कोरल. तर आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा संपूर्ण जल्लोष केला जात आहे.
टीम इंडियाने घेतली पीएम मोदी यंची भेट
29 जूनला टी20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. पण विजयानंतर टीम इंडिया बारबाडोसमध्येच अडकली. वादळामुळे टीम इंडियाला मायदेशात पोहोचण्यास तीन दिवस उशीर झाला. अखेर चार जूनला टीम इंडियात मायदेशात दाखल झाली. दिल्लीत टीम इंडियाचे जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतला.
1983 वर्ल्ड कप विजयाचं स्वागत
पण तुम्हाला माहित आहे का देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या टीम इंडियाचं स्वागत कसं झालं होतं. 1983 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बलाढ्य वेस्टइंडिजचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. पहिल्यांदा वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियाचं भारतात भव्य स्वागत करण्यात आलं. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय खेळाडूंचं स्वागत केलं. भारतीय खेळाडू राष्ट्रपती भवनाला भेट दिली, तिथे त्यांच्यासाठी डिनर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडियाचा हा विजय ऐतिहासिक आहे, हा विजय कायमचा लक्षात राहिल, येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यावेळी इंदिरा गांधी यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूकही काढण्यात आली होती. भारतात त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. टीम इंडियाचे कर्णधार कपिल देव यांनी वर्ल्ड कपची ट्रॉफी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हातात सोपवली होती.
बीसीसीआयकडे नव्हते पैसे
त्यावेळी भारतीय खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी टीम इडियाकडे पैसे नव्हते. त्यामुळे बीसीसीआयने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यकर्मातून 20 लाख रुपये जमले, हे पैसे खेळाडूंमध्ये वाटण्यात आले.
2007 मध्येही जंगी स्वागत
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. यावेळी देखील टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईत एका ओपन बसमधून रॅली काढण्यात आली होती. ही रॅली 30 किमीपर्यंत चालली. मुंबई विमानतळापासून वानखडे स्टेडिअमपर्यंत रॅली सुरु होती.
2011 वर्ल्ड कप विजयाची रॅली
यानंतर 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत जेतेपद पटकावलं. या विजयानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी करण्यात आली. विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार एमएमस धोनी आणि सचिन तेंडुलकरने गेट वे ऑफ इंडियावर एक फोटो शूट केलं. टीम इंडिया मुंबईतच असल्याने रॅली काढण्यात आली नव्हती. दिल्लीत माजी पंतप्रधान महमोहन सिंग यांच्यासोबत डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.