Dhanashree Verma Shares New Post: आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं. अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला अन् थेट विश्वविजेतेपदाला (T20 World Cup 2024) गवासणी घातली. टीम इंडियाचं भारतात जल्लोषात स्वागत झालं. त्याआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी खेळाडू आपल्या कुटूंबियांसोबत आले होते. यावेळी यझुवेंद्र चहलसोबत (Yuzvendra Chahal Wife) धनश्री न दिसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अशातच आता धनश्रीची पोस्ट चर्चेत आहे.


धनश्रीची पोस्ट काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्री वर्माने नुकतीच इन्टाग्रामवर नवी पोस्ट केली आहे. यामध्ये धनश्री आणि यझुवेंद्र चहल दिसतोय. धनश्रीने युझीसोबत सेल्फी घेतली. त्यावेळी युझीच्या गळ्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं मेडल देखील दिसतंय. धनश्रीने Hey World Champion असं कॅप्टन या फोटोला दिलंय. या फोटोमध्ये दोघंही आनंदी असल्याचं दिसतंय. धनश्रीच्या फोटोवर अनेकांनी भन्नाट कमेंट देखील केल्या. झिरो किल विथ चिकन डिनर अशी कमेंट काहीजणांनी केलीये. तर नताशा स्टेनकोविकपेक्षा बरी आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.



तुम्हाला माहिती नसेल तर, यझुवेंद्र चहलची टी-ट्वेंटी स्कॉडमध्ये निवड झाली होती. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी सुपर 8 मधील पहिल्या सामन्यापासून अखेरच्या सामन्यापर्यंत एकही बदल केला नव्हता. त्यामुळे बेंचवरच्या खेळाडूंना संधी मिळाली नाही. त्यामुळे वर्ल्ड कप मेडल मिरवल्याने बेंचवरचे खेळाडू टीकेचे धनी होत आहेत. मात्र, वर्ल्ड कप विजय ही संपूर्ण संघाची मेहनत आहे, याचं भान राखलं गेलं पाहिजे.


दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघेही नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात युझवेंद्र चहललाही स्थान मिळाल्यानंतर धनश्रीची पोस्ट व्हायरल झाली होती. तो परत आलाय, असं कॅप्शन दिलेला एक फोटो धनश्रीने पोस्ट केला होता. ज्यामध्ये टीम इंडियाच्या यादीत युझी चहलचं नाव होतं.