Sport News : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मधील संघांमधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. तोडीस तोड सामने पाहायला मिळत आहेत. नुकताच भारत पाकमध्ये झालेला हाय व्होल्टेज सामना तर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी पाहिला, त्यामुळे आता पुढच्या होणाऱ्या सामन्यांविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच ऑस्ट्रेलियाच्याच एका खेळाडूने वर्ल्ड कप थांबवण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यापूर्वी झालेल्या मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाकडून पत्रकार परिषदेसाठी आला. यावेळी त्याला भारत पाक सामन्याविषयी विचारण्यात आलं त्यावर मार्शने मजेशीर प्रतिक्रिया दिली. मला आता वाटतं की वर्ल्ड कप इथे थांबवावा, कारण अशा सामन्यानंतर अजून कसला थरार तुम्हाला पाहायचा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कायम रोमांचक असून हा सामना स्टेडिअममधील गर्दीत राहून तो थरार अनुभवणं याची मी कल्पनाही करू शकत नसल्याचं मार्श म्हणाला. 


मार्शने यावेळी बोलताना भारत पाक सामन्यावेळी विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचंही भरभरून कौतुक केलं. कोहलीबद्दल बोलायचं झालं तर मागील एक वर्षापासून तो संघर्ष करताना दिसत होता मात्र वर्ल्ड कपसारथ्या मोठ्या सामन्यामध्ये त्याने त्याचा क्लास दाखवून दिला आशा आहे की तो अशाच आणखी खेळी करेल, असं मार्शने म्हटलं आहे. 


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने विजयी खेळी खेळली. त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी कोहलीला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कारही देण्यात आला. कोहलीशिवाय हार्दिक पांड्यानेही शानदार खेळी खेळली, त्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 3 बळी घेतले.