T20I मधून या खेळाडूचं गेम ओव्हर! वनडे आणि टेस्टमध्येच संधी
टीम इंडियातील 2 खेळाडूंचा T20I मधील करिअर संपल्यात जमा, तिसरा नंबर विराटचा?
मुंबई : विराट कोहली सध्या वाईट फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी दिली जाणार आहे. विराट कोहलीसोबत आता टीम इंडियातील आणखी एका खेळाडूचं करिअर धोक्यात आलं आहे. त्याला सतत बेंचवर बसवलं जात आहे. त्यामुळे आता त्याला टी 20 क्रिकेटमध्ये यापुढे संधी मिळणार नाही अशी चिन्हं आहेत.
टीम इंडियातील हा खेळाडू वन डे आणि कसोटी फॉरमॅटसाठी खेळेल पण टी 20 साठी संधी मिळणार नाही असे संकेत निवड समितीतील अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मोहम्मद शमीसाठी आता टी 20 क्रिकेटचे दरवाजे बंद झाले आहेत.
मोहम्मद शमीने टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. टीम इंडियातून हर्षल पटेल, दीपक चहर यांसारख्या नवख्यांना संधी देण्यात आली. शमीला पर्याय शोधण्यात आला. शमीप्रमाणेच, वॉशिंग्टन सुंदर देखील भारताच्या T20 वर्ल्ड कपचा भाग नसेल अशी चर्चा आहे.
निवड समितीमधील एका अधिकाऱ्याने दिेलेल्या माहितीनुसार, शमीला आता कसोटीसाठी राखून ठेवणं महत्त्वाचं आहे. टी 20 क्रिकेटसाठी सध्या शमीचा कोणताही विचार नाही. टी 20 फॉरमॅटसाठी सध्या तरी युवा खेळाडूंना जास्त संधी देण्याकडे निवड समितीचा कल असल्याचा खुलासा त्यांनी केला.
निवड समितीच्या म्हणण्यानुसार शमी आता वन डे आणि कसोटीसाठी खेळेल पण टी 20 साठी नाही. हे समीकरण आता निश्चित झालं आहे. शमीसारखंच वॉशिंग्टन सुंदर देखील टी 20 मधून आऊट झाल्यात जमा आहे. आता विराट कोहलीचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर शमी आणि सुंदर दिसणार नाही म्हटल्यावर चाहत्यांची निराशा झाली आहे.