मुंबई : एका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एका 14 वर्षाच्या खेळाडूने नाबाद 1045 रन बनवल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तनिष्कने या इनिंगमध्ये 515 बॉलचा सामना केला. त्याने 67 सिक्स आणि 149 फोर लगावले.


नवा रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनिष्क गावटे याने नाबाद 1045 रन बनवले आहेत. तनिष्कच्या बॅटने हा कारनामा करुन दाखवला. अंडर-14 शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने हा कारनामा केा आहे. तनिष्कने या इनिंगमध्ये 515 बॉलचा सामना केला. त्याने 67 सिक्स आणि 149 फोर लगावले.


नाबाद खेळी


तनिष्कने 1045 रन करत नवा रेकॉर्ड बनवला आहे. तनिष्कच्या या खेळीने कल्याणच्या प्रणव धनावडेच्या त्या कामगिरीची आठवण झाली. ज्याने 2 वर्षापूर्वी 1009 रन केले होते. धनावडने इंटर स्कूल टूर्नामेंटमध्ये भंडारी कपमध्ये हा कारनामा केला होता. तेव्हा प्रणवने शालेय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड बनवला होता. ऑर्थर कॉलिंसचा त्याने रेकॉर्ड मोडला होता. ज्याने 1899 मध्ये 628 रन्सची खेळी केली होती.


नवा तारा


तनिष्कच्या कोचने हा दावा केला आहे की, तनिष्कने सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात हा स्कोर केला आहे. या युवा खेळाडूने कोपारखैरने स्थित यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये हा कारनामा केला.