New Zealand Test Squad vs Bangladesh: सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्डकपचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच क्रिकेट बोर्डाने टेस्ट टीमची घोषणा केली आहे. 28 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सिरीज रंगणार आहे. यासाठी न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने बांगलादेशविरूद्ध टेस्ट स्क्वाड कसा असणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. 


या खेळाडूचं नशीब चमकलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धच्या आगामी टेस्ट सिरीजसाठी न्यूझीलंडने त्यांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या एका खेळाडूचं नशीब चमकलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी डावखुरा स्पिनर गोलंदाज मिचेल सँटनरचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या वर्ल्डकपमध्ये सँटनर उत्तम कामगिरी करत असून त्याने 14 विकेट्स काढले आहेत.


2 वर्षानंतर झालं टीममध्ये कमबॅक


मिचेल सॅटनर न्यूझीलंडचा एक उत्तम गोलंदाज मानला जातो. सँटनरने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 24 टेस्ट सामने खेळले आहेत. तर आता तब्बल 2 वर्षानंतर त्याचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालं आहे. जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. यासोबत एजाज पटेल आणि ईश सोधी हेही स्पिनर गोलंदाज टीममध्ये असणार आहेत. तसंच ऑफस्पिन ऑलराऊंडर रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनाही टीममध्ये संधी मिळालीये.



काईल जॅमिसनचंही दुखापतीनंतर होणार कमबॅक 


न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जॅमिसनही फीट झाल्यानंतर टीममध्ये परतला आहे. मॅट हेन्रीच्या दुखापतीनंतर टीममध्ये त्याच्या जागी जॅमिसनचाही समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कर्णधार टीम साऊदी वेगवान गोलंदाजी करणार आहे. या सिरीजतील पहिला टेस्ट सामना 28 नोव्हेंबरपासून सिलहटमध्ये सुरू होणार आहे. तर 6 डिसेंबरपासून दुसरा टेस्ट सामना ढाकामध्ये खेळवला जाणार आहे.


कसा आहे बांगलादेशविरूद्ध न्यूझीलंडचा स्क्वॉड


टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, केन विलियम्सन आणि विल यंग.