लंच ब्रेकपर्यंत भारतीय टीमने ५ विकेट गमावत केले २५१ रन
भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची सिरीज सुरु आहे. या सिरीजच्या पहिल्या सामन्याच्या पाचव्य़ा दिवशी भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट गमावत 251 रन बनवले आहे.
कोलकाता : भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची सिरीज सुरु आहे. या सिरीजच्या पहिल्या सामन्याच्या पाचव्य़ा दिवशी भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट गमावत 251 रन बनवले आहे.
भारताची दुसरी इनिंग
भारताची पाचवी विकेट ही जडेजाच्या रुपात पडली. जडेजा 9 रनवर परेराच्या बॉलवर आऊट झाला. आता अश्विन आणि विराट क्रिजवर आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला ऑलआउट करत सामन्याच्या चौथ्या दिवशी दूसऱ्या इनिंगला सुरुवात केली. चौथ्या दिवशी भारताने 1 विकेटवर 173 रन बनवले. शिखर धवन 94 रनवर आऊट झाला,
लोकेश राहुल 79 रनवर तर चेतेश्वर पुजारा 22 रनवर आऊट झाला. पुजारानंतर अजिंक्य रहाणे बॅटींगसाठी आला पण तो देखील शुन्यावर आऊट झाला.
श्रीलंकेची पहिली इनिंग :
श्रीलंकाने पहिल्या इनिंगमध्ये 294 रन बनवले. लाहिरु थिरिमाने 51 आणि एंजेलो मॅथ्यूजने 52 रन केले. रंगना हेरथने 67 रन बनवले. कर्णधार चंडीमल 28 आणि विकेटकीपर डिकवेलाने 35 रन बनवले. पहिल्या इनिंगमध्ये टॉस हारत भारताने 172 रन केले होते. तर श्रीलंकेने 294 रन बनवले आहेत.