Team India : 7 जूनपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( ICC World Test Championship ) फायनल खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यापूर्वी बीसीसीआयने ( BCCI ) टीम इंडियामध्ये ( Team India ) एक मोठा बदल केलाय. 


टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला बीसीसीआयकडून गिफ्ट देण्यात आलं आहे. बीसीसीआयने नुकताच Adidas सोबत करार करत त्यांना किट प्रायोजक बनवलं होतं. तर गुरुवारी आदिदासने टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच ( Indian Cricket Team Jersey Launch ) केलीये. त्यामुळे येत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात टीम इंडिया ही नवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.


तिन्ही फॉर्मेटच्या जर्सीमध्ये बदल


यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) तिन्ही फॉर्मेटच्या जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात आदिदासने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये या नव्या तिन्ही जर्सी लॉंच केल्या आहेत. यापूर्वी एमपीएल किट स्पॉर्नर होतं. मात्र बीसीसीआयने एमपीएलसोबतचा हा करार संपुष्टात आणलाय. 



खास पद्धतीने केली जर्सी लॉंच


आदिदास इंडियाने जर्सी लॉन्च करताना अगदी खास पद्धत वापरली आहे. यावेळी स्टेडियमवरून ड्रोनच्या सहाय्याने टीम इंडियाची जर्सी हवेत लटकलेली दिसली. दरम्यान यावेळी काही लोकांनी ट्रेनमधून आणि रस्त्यावरून हा अद्भुत नजारा कॅमेरात कैद केला आहे. 



WTC Final साठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.


सबस्टिट्यूट खेळाडू - सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार