Hardik Pandya Controversy : भारत आणि श्रीलंकादरम्यान (India vs Sri Lanka) कोलकातामध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने लंकेवर (India Beat Sri Lanka) चार विकेटने मात करत सामन्याबरोबर मालिकाही जिंकली. 3 सामन्यांची ही मालिका 2-0 अशी जिंकत भारताने नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. पण या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगाने टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ट्रोल केलं जात आहे. इतकंच नाही तर त्याच्यावर तीन सामन्यांच्या बंदीची मागणीही केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा ऑलराऊंडर चर्चेत
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या नेहमीच चर्चेत असतो. कधी मैदानावर आपल्या खेळीने तर कधी मैदानाबाहेर आपल्या स्टाईल आणि वक्तव्याने त्याची चर्चा होत असते. आता हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो आपल्या मैदानावरच्या कामगिरीने नाही तर डगआऊटमध्ये केलेल्या वर्तणूकीमुळे वादात अडकला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. 


हार्दिक पांड्याने केली शिवीगाळ
कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत आणि श्रीलंकादरम्यान दुसरा एकदिवसीय (India vs Sri Lanka 2nd ODI) सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाची पहिली गोलंदाजी होती. सामन्याच्या दहाव्या षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवला. याचदरम्यान हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली. हार्दिक पांड्याने डग आऊटमध्ये बसलेल्या ज्युनिअर खेळाडूकडे पाणी मागितलंहोतं. पण ते न आल्याने हार्दिक संतपला, यावेळी कॅमेरासमोर शिवीगाळ करताना तो दिसतोय. आधीच्या षटकात पाणी मागितलं होतं, अजून आलं नाही, "तिथे बसून  काय XXX आहात' असे अपशब्द त्याने वापरले.


शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल
हार्दिक पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या ज्युनिअर खेळाडूबरोबर अशा प्रकारची वागणूक चुकीचं असल्याचं सांगत नेटिझन्सने त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. काही युजर्सने अशा वर्तुणकीबद्दल हार्दिक पांड्यावर तीन सामन्यांच्या बंदीची मागणी केली आहे. 


भारताने मालिका जिंकली
दरम्यान, हा सामना जिंकत टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजीसमोर लंकेच्या फलंदाजांचा टीकाव लागला नाही. अवघ्या 125 धावांवर लंकेचे 5 फलंदाज तंबूत परतले. यातून श्रीलंकेचा संघ उभा राहू शकला नाही. त्यांची इनिंग 215 धावांवर आटोपली. श्रालंकेतर्फे नाविंदु फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्यात. तर भारताकडून मोहम्द सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. उमरान मलिकने 2 विकेट तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली.