मुंबई : टीम इंडियाचा (Team India) रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हा आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर अफलातून कामगिरी करतो. जाडेजा वनडे, कसोटी आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटसाठी परफेक्ट खेळाडू आहे. मात्र आता जाडेजा क्रिकेटच्या एका फॉर्मेटमधून लवकरच निवृत्त होणार असल्याचे संकेत मिळतायेत. (team india all rounder sir ravindra jadeja might be retire from test cricket due to focus on other format)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाडेजा निवृत्त होणार? 


जाडेजा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. जाडेजा गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे ग्रस्त आहे. त्यामुळे जाडेजाला आफ्रिका दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. जाडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी 5-6 महिन्यांचा अवधी लागू शकतो.  


जाडेजा वनडे, टी 20 आणि आयपीएलमधील कामगिरीवर आणखी भर देण्यासाठी कसोटी क्रिकेटला राम राम करु शकतो, अशी माहिती जाडेजाच्या जवळच्या मित्राने दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखत दिली. 


जाडेजाची कसोटी कारकिर्द


जाडेजाने 57 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या 57 सामन्यातील ल 84 डावात त्याने 2 हजार 195  धावा केल्या. यात 1 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 232 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत.