Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया, मोठ्या काळासाठी टीम इंडियातून बाहेर
टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja Knee Operation) गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे.
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja Knee Operation) गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. स्वत: जाडेजाने शस्त्रक्रियानंतरच फोटो शेअर केले आहेत. जाडेजाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कप (Asia Cup 2022) आणि टी 20 वर्ल्ड कप 2022 मधून बाहेर पडावं लागलं. (team india allrounder ravindra jadeja operation complete he share photo on social media)
जाडेजाच्या पोस्टमध्ये काय?
"शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या दरम्यान अनेकांनी विश्वास दिला. अशांचा मी आभारी आहे. यात. BCCI, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहते. मी लवकरच माझं रिहॅब सुरू करेन. मी शक्य तितक्या लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार", अशी पोस्ट जाडेजाने केलीय.
जाडेजाच्या जागी पटेलचा समावेश
दरम्यान जाडेजा स्पर्धेतून बाहेर झाल्याने त्याच्या जागी आशिया कपमध्ये ऑलराउंडर अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. अक्षरही सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. मात्र त्याला अजून एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. अक्षरचा आशिया कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. आता त्याचा मुख्य संघात समावेश झालाय.