टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा केव्हा भिडणार? जाणून घ्या पुढील सामन्यांबाबत
टीम इंडिया आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan Match) सामना म्हणजे हायव्होलटेज ड्रामा, हमरीतुमरी आणि थरार, असं कम्पलीट पॅकेज.
मुंबई : टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील मोहिमेची सुरुवात ही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापासून झाली. या सामन्यात मोठा उलटफेर झाला. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये नेहमीच टीम इंडियाकडून पराभूत होणाऱ्या पाकिस्तानने या सामन्यात मात्र विराटसेनेवर 10 विकेट्सने मात केली. यासह पाकिस्तानने आयसीसी स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पहिलावहिला विजय साजरा केला. (Team India and Pakistan play against each other in next time know about venue and schedule match)
भारतात क्रिकेटला धर्म समजला जातो. त्यात टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना म्हणजे हायव्होलटेज ड्रामा, हमरीतुमरी आणि थरार, असं कम्पलीट पॅकेज. क्रिकेट चाहते नेहमीच या दोन्ही संघाच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहतात. या टी 20 वर्ल्ड कपनंतर पुन्हा दोन्ही संघ केव्हा आमनेसामने येणार आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील वर्षात म्हणजेच 2022 मध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेला देण्यात आला आहे. थोडक्यात काय तर श्रीलंका या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आमनासामना होणं अपेक्षित आहे.
आशिया कप स्पर्धेचं 1983 पासून सुरुवात करण्यात आली. गतवेळेस या स्पर्धेचं 2018 मध्ये करण्यात आलं होतं. तेव्हा टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळेस टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाकिस्तानवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता.
यानंतर 2 वर्षांनी दोन्ही संघांचा सामना होणार आहे. एका रिपोर्टनुसार टीम इंडिया 2023 साली पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात. आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत 2023 मध्ये होणाऱ्या आशिया चषकाच्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानला देण्यात आली आहे. यानंतर 2023 मध्ये वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होणार आहे. तेव्हा पाकिस्तान क्रिकेट टीम भारतात येईल. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानात होणाऱ्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी आयोजित करणार नसल्याचं पाकिस्तानने आधीच स्पष्ट केलं आहे. पीसीबी आणि बीसीसीआयने याबाबत खातरजमा केली आहे. लवकरच याचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धेचं आयोजन करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांचा सामना करतील. टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताचा होता. मात्र कोरोनामुळे या स्पर्धेचं आयोजन हे यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आलं. नाहीतर पाकिस्तान भारतात टीम इंडिया विरुद्ध सामना खेळली असती.