मुंबई : द. आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. या मालिकेद्वारे सुरेश रैना आणि जयदेव उनदकटचे संघात पुनरागमन झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक महिन्यांपासून संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाला आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात सामील करण्यात आलेय. यासोबत युवा क्रिकेटर जयदेव उनदकटही बऱ्याच महिन्यानंतर संघात परततोय.


जयदेव उनकटला डबल लॉटरी


जयदेव उनदकटला आज आयपीएलच्या लिलावादरम्यान तब्बल ११.५० कोटी रुपयांची बोली लागली. आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेला तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरला. त्याला विकत घेण्यासाठी पंजाब आणि चेन्नईमध्ये चुरस रंगलेली असताना राजस्थान रॉयल्सने ११.५० कोटींची बोली लावत संघात घेतले. ही बातमी असतानाच द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही त्याची संघात निवड करण्यात आलीये. त्यामुळे आजचा दिवस हा त्याच्यासाठी डबल लॉटरी लागण्याचा दिवसच समजावा लागेल. 


अशी रंगणार मालिका


द. आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १८ फेब्रुवारीला पहिला टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर २१ आणि २४ फेब्रुवारीला दुसरा आणि तिसरा सामना रंगणार आहे.


असा आहे टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ


विराट कोहली(कर्णधार,) रोहित शर्मा, शिखर धवन,  लोकेश राहुल, सुरेश रैना, एम एस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, अक्षऱ पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनदकट, शार्दूल ठाकूर


कसोटी मालिकेत भारताचा २-१ने पराभव


याआधी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला द. आफ्रिकेकडून २-१ असा पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन्ही कसोटीत आफ्रिकेने बाजी मारली. तर तिसऱ्या कसोटीत भारताने विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला.