Team India Squad For WI T20 Series: टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाला टी-20 सिरीज खेळायची आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे टी-20 फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना डच्चू देण्यात आला आहे. तर हार्दिक पंड्या टीमच्या खांद्यावर टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 


रोहित विराटला पुन्हा डच्चू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी रात्री बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी टीमचे सिनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोहित शर्मा नसल्याने कर्णधारपदाची धुरा ही हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. 


यशस्वी आणि तिलकला संधी


यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा यांचा समावेश होता. दरम्यान या दोघांच्याही खेळीची दखल घेत त्यांना टीम इंडियाच्या टी-20 सिरीजमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे संजू सॅमसनचाही समावेश केला गेलाय. मात्र कोलकात्याचा मॅच विनर रिंकू सिंगला टीममध्ये संधी मिळालेली नाही.



कशी असेल वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडिया


ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार


  • पहिली T20 - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

  • दुसरी T20 - 6 ऑगस्ट, गयाना

  • तिसरी T20 - 8 ऑगस्ट, गयाना

  • चौथी T20 - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा

  • पाचवी T20 - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा