India’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी 15 सदस्यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी शुभमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यासाठी सर्व सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये चमकलेला अभिषेक शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. 


युवा खेळाडूंना मिळाली संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रियान पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे आणि नितीश रेड्डी यांच्यासह अनेक युवा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनसोबत ध्रुव जुरेलला विकेटकीपिंगसाठी टीममध्ये जागा मिळाली आहे. याचसोबत ऋतुराज गायकवाडचेही टीममध्ये कमबॅक झाले आहे.


टी-20 वर्ल्डकप स्क्वॉडमधून केवळ 2 जणांचं सिलेक्शन


T20 वर्ल्डकप 2024 च्या मुख्य टीममध्ये समाविष्ट असलेल्या 15 पैकी 13 खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी वर्ल्डकप टीममधून केवळ यशस्वी जस्वाल आणि संजू सॅमसन यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद यांची T20 वर्ल्डकपसाठी राखीव म्हणून निवड करण्यात आली होती आणि ते मुख्य टीमचा भाग नव्हते. गिल, रिंकू, आवेश आणि खलील यांनाही झिम्बाब्वेविरूद्ध टीममध्ये स्थान मिळालं आहे.


झिम्बाब्वेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारताचा संघ


शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.


भारतीय टीमचा झिम्बाब्वे दौरा (जुलै 2024)


  • ६ जुलै – पहिली टी 20, हरारे

  • ७ जुलै – दुसरी टी 20, हरारे

  • 10 जुलै- तिसरी टी 20, हरारे

  • 13 जुलै- 4 थी टी 20, हरारे

  • 14 जुलै - 5वी टी 20, हरारे