नवी दिल्ली : टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नव्या जर्सीत दिसणार आहे. टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने तक्रार दाखल केल्यानंतर स्पोर्ट्स उत्पादने तयार करणारी नाईके कंपनी नव्या जर्सी उपलब्ध केल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००६ पासून नाईके टीम इंडियाला स्पोर्ट्स किट पुरवत आहे. २०१६मध्ये नाईके आणि बीसीसीआयमध्ये करार झाला. या करारानुसार २०१६ ते २०२०पर्यंत नाईके टीम इंडियाच्या स्पोर्ट्स किटचा स्पॉन्सर राहणार आहे. यासाठी नाईकने क्रिकेट बोर्डाला साधारण ३७० कोटी रुपये दिलेत. 


मात्र, क्रिकेटर्स आणि क्रिकेट बोर्डाने यांनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली होती. नाईकेकडून पुरवल्या जाणाऱ्या जर्सीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे क्रिकेटर्सचे म्हणणे होते. 


खेळाडूंच्या या तक्रारीनंतर आता नाईके नवी जर्सी क्रिकेटर्सना देतेय. टीम इंडियाची नवी जर्सी ही पहिल्या जर्सीसारखीच दिसते मात्र यात उच्च दर्जाच्या कापडाचा वापर करण्यात आलाय.