IND vs NZ World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. तब्बल 20 वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सामन्यात पराभव केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने टीम इंडियाने विजयादशमी साजरी केली आहे. डॅरिल मिचेलच्या (Daryl Mitchell) शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाला 274 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली (Virat Kohli) याच्या संयमी रनचेसने टीम इंडियाला विजय साकारता आला आहे. त्याचबरोबर आता टीम इंडिया पॉईट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान झालीये. (Team India Beat New Zealand By 5 wickets in World Cup After 20 Years)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या 11 ओव्हरमध्ये 70 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने सलामी जोडी तंबूत पाठवली. मात्र, मैदानात विराट कोहली पाय रोऊन ऊभा होता. विराटने एक बाजू लावून धरली अन् दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर धावा कुटत होता. श्रेयसनंतर केएल राहुल देखील 27 धावा करत बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. विराटच्या एका चुकीमुळे सूर्यकुमार यादवची विकेट गेली, अशी चर्चा सुरू झालीये. मात्र, विराटला आपली चूक कळाली अन् अखेरपर्यंत टकून टीम इंडियाचा विजय पक्का केला. त्याने 95 धावांची विराट खेळी केली.


धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पहिल्या 10 ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शमीने फासे आवळले अन् न्यूझीलंडला धावगती रोखली. दोन्ही सलामीवीर तुंबत परतल्यानंतर  रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी हात मोकळे केले आणि संयमी धावा कुटल्या. 178 वर टीम इंडियाला तिसरी विकेट मिळाली. त्यानंतर डॅरिल मिचेल याने 100 बॉलमध्ये शतक ठोकलं. मात्र, टॉम लिथमच्या विकेटनंतर न्यूझीलंडचा डाव ढासळला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.  डॅरिल मिचेलने अखेरीस आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याने 130 धावा केल्या. विराटने बॉन्ड्रीवर एक अप्रतिम कॅच घेत न्यूझीलंडचा खेळ संपवला न्यूझीलंडचा संघ 50 ओव्हरमध्ये 273 धावा करत ऑलआऊट झाला. भारताक़डून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पाच विकेट्स घेतल्या. पहिल्याच सामन्यात शमीने पंच लगावला आहे.


मोहम्मद शमीने मोडला अनिल कुंबळेचा रेकॉर्ड, वर्ल्ड कपमध्ये मोठा कारनामा!


IND vs NZ : शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.