WTC Point Table : खडूस ऑस्ट्रेलियामुळे टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; `या` क्रमांकावर पोहोचला संघ
WTC Points Table Update : कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. तसेच टीम इंडियाला गुड न्यूज देखील मिळाली आहे.
ICC World Test Championship Point Table : सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं आहे. भारताने 3-1 ने मालिकेत विजय आघाडी मिळाल्याने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये (WTC Points Table) मोठे बदल झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (New Zealand vs Australia) यांच्यातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. तसेच टीम इंडियाला गुड न्यूज देखील मिळाली आहे.
चौथ्या कसोटीच्या निकालानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल झाले होते. भारतीय संघाची ही टक्केवारी 64.58 पर्यंत वाढली होती. तर त्यावेळी न्यूझीलंडचा संघ 75 टक्के घेऊन अव्वलस्थानी होता. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर न्यूझीलंडची टक्केवारी घसरली आहे. न्यूझीलंडला धक्का बसल्यानंतर संघाची टक्केवारी 60 वर आली आहे. तर ऑस्ट्रेलियाला फायदा झाला असून ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
टीम इंडियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 मध्ये आत्तापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 जिंकले आहेत तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिलाय.
दरम्यान, धर्मशाला येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG 5th Test) सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडची घोषणा केली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा पाचव्या कसोटीला देखील मुकणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिलीये. तर जसप्रीत बुमराहचं कमबॅक झालंय.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 :
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.