न्यूझीलंड दौऱ्यानंतर Team India मध्ये होणार मोठे बदल; एकत्रच 8 खेळाडूंची होणार गच्छंती!
न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वनडे सिरीज खेळणारे 8 खेळाडू बांगलादेशाच्या (IND vs BAN) सिरीजमध्ये नसतील.
Indian Cricket Team: टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता वनडे सिरीजमधील (India vs New Zealand ODI) तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना बाकी आहे. टी-20 सिरीज टीम इंडियाने 1-0 अशी जिंकली होती. तर वनडे सिरीजमध्ये न्यूझीलंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वनडे सिरीज खेळणारे 8 खेळाडू बांगलादेशाच्या (IND vs BAN) सिरीजमध्ये नसतील.
याचं कारण म्हणजे बांगलादेशाच्या दौऱ्यावर सिनियर खेळाडूंची टीम जाणार आहे. त्यामुळे सध्या टीममध्ये असलेल्या अनेक खेळाडूंचा बांगलादेश दौरा करता येणार नाहीये.
हे 8 खेळाडू पुढच्या सिरीजमध्ये नसणार!
बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडिया 2 सामन्यांची वनडे सिरीज आणि 2 टेस्ट सिरीज खेळणार आहे. यादरम्यान टीमचा नियमित कर्धणार रोहित शर्मा (Rohit Sharma) सकट अजून सिनियर खेळाडू कमबॅक करणार आहेत. न्यूझीलंडच्या विरूद्ध शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह तसंच उमरान मलिकला बांगलादेशाच्या विरूद्ध वनडे सिरीजमध्ये आराम देण्यात येणार आहे.
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया
वनडे सिरीज: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.
टेस्ट सिरीज: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार)), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, सौरभ कुमार, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
9 वर्षांनंतर भारताला सिरीज जिंकण्याची संधी
9 वर्षांनंतर भारतीय टीमला न्यूझीलंडने आयोजित केलेल्या वनडे मालिकेत पराभूत करण्याची संधी होती. टीम इंडियाने 2013 मध्ये 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-1 ने पराभव केला होता. आता 30 नोव्हेंबरला होणारी तिसरी वनडे भारताने जिंकली तर मालिका 1-1अशी बरोबरीत संपेल.
न्यूझीलंडला मालिका जिंकण्याची संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचे 112 रेटिंग गुण होते. मात्र, आता टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. टीम इंडियाचे 110 गुण झालेत. न्यूझीलंडसोबत पहिला सामना गमावल्यानंतर गुण कमी झालेत. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.