Team India Return: भारतीय संघ अखेर बारबादोसमधून मायदेशी परतले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियासाठी स्पेशल चार्टड फ्लाईटची व्यवस्था केली. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास टीम इंडिया थेट दिल्लीच्या ITC मौर्य हॉटेल चाणक्यपुरी येथे पोहोचली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि यशस्वी जैसवाल यांनी आपल्या अनोख्या परफॉर्मन्सने आनंद साजरा केला. त्यानंतर या खेळाडूंसाठी खास नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेलने यावेळी भारतीय संघासाठी स्पेशल केक तयार केला होता. जो टीम इंडियाच्या जर्सीप्रमाणे होता. तसेच यावेळी 16 तासांचा प्रवास करुन आलेल्या या संघासाठी विविध प्रकारचे घरगुती ट्रफल्स, विविध प्रकारचे चॉकलेट-कोटेड नट्स आणि विविध प्रकारचे चवदार पदार्थ देखील ठेवण्यात आले होते.


जर्सीप्रमाणे केक 



"केक संघाच्या जर्सीच्या रंगाप्रमाण तयार करण्यात आला होता. त्याची खासियत ही ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी चॉकलेटपासून बनलेली आहे. विजेत्या संघाचे स्वागत करणे ही आमची जबाबदारी आहे. ” ITC मौर्य मधील कार्यकारी शेफ यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले.


"ITC मौर्या टिकावूपणावर विश्वास ठेवतात, त्यामुळे न्याहारीमध्ये बाजरीचे पर्याय आहेत. आरोग्यदायी अन्न तसेच थोडेसे भोग आहेत," ते पुढे म्हणाले.


टीम इंडियाचा असा होता नाश्ता 


संघासाठी 3-लेअरचा केक तयार करण्यात आला होता. जो कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कोच राहुल द्रविड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी निघण्यापूर्वी कापला होता.


 काही कस्टम स्नॅक्समध्ये पिस्ता नानकताई, चारोळी आणि पेपरिका चीज ट्विस्ट यांचा नाश्तामध्ये समावेश होते. प्लेअर्सच्या रुममध्ये स्पेशल चॉकलेट ट्रफल रोल होते. खाण्यायोग्य चॉकलेट बॉल, बॅट, विकेट आणि खेळपट्ट्याही तयार केल्या होत्या.


हॉटेलमधील बुफे नाश्त्यामध्ये आंबा, जांभूळ आणि चेरी यांसारख्या स्थानिक हंगामातील फळांचा समावेश होता.


भारताचा कर्णधार रोहितला मुंबईसारखा वडा पाव देण्यात आला होता. विराट कोहलीसाठी अमृतसरी शैलीतील छोले भटुरे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या नाश्तामुळे खेळाडूंना मायदेशी परतल्याची भावना नक्कीच जागी झाली असेल.