बंगळुरू : एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर अफगाणिस्तान क्रिकेट टीमला 5 दिवसांच्या टेस्ट मॅचमध्ये भारताने फक्त 2 दिवसात पराभूत केलं. पराभूत करुनही भारताने जगासमोर एक अनोखं उदाहरण सादर केलं. विजयानंतर ट्रॉफीसोबत फोटो काढतांना टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना देखील फोटो काढण्यासाठी बोलवलं. असं खूप कमी पाहायला मिळतं. जेव्हा विजेता टीम विजय साजरा करत असतांना विरुद्ध टीमला देखील सहभागी करुन घेतात. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने टीम इंडियाच्या या मोठ्या मनाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने टीम इंडियाचं कौतूक केलं आहे. 43 सेंकदाच्या या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू ट्रॉफीसोबत फोटो काढत आहेत. भारतीय टीमने दाखवलेल्या या भावनेमुळे निराश झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडुंच्या चेहऱ्यावर देखील हसू फुललं. व्हिडिओमध्ये भारतीय टीम आणि अफगाणिस्ताचे खेळाडू एकत्र फोटो काढतांना दिसले. बीसीसीआय मागील अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानला मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतासोबत झालेली पहिली टेस्ट देखील त्याचंच एक कारण आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या टीमला भारतात 2 स्टेडिअम देखील उपलब्ध करुन दिले आहेत. भारताच्या ग्रेटर नोएडा आणि देहरादून स्टेडिअममध्ये अफगाणिस्तानची टीम घरगुती सामने खेळू शकणार आहे. 



बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या क्रिकेटच्या हितात अनेक निर्णय घेतले आहेत. भारतात अफगाणिस्तान अशी पहिली परदेशी टीम आहे जी सराव करणार आहे.



पीटरसनने देखील या गोष्टीचं कोतूक केलं.