FIFA World Cup 2026: फीफा वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. 2022 वर्ल्डकप स्पर्धेची सांगता 18 डिसेंबर 2022 रोजी अंतिम सामना झाल्यानंतर होणार आहे. अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या संघात होणार आहे. या स्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वीच 2026 या विश्वचषकाची तयारी सुरु झाली आहे. ही फुटबॉल स्पर्धा उत्तर अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धचं यजमानपद कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका संयुक्तपणे बजावणार आहे. या स्पर्धेत 32 ऐवजी 48 सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर फुटबॉल वर्ल्डकप समिती मंथन करत आहे. ग्रुप स्टेजमध्ये तीन तीन संघाचे 16 ग्रुप तयार केले जातील. त्यापैकी दोन संघ पुढच्या फेरीत पात्र ठरतील. त्यामुळे भारताला या स्पर्धेत स्थान मिळवण्याची नामी संधी आहे. भारताला 48 संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आतापासूनच विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्याच्या फीफा क्रमवारीत भारताचं 106 वं स्थान आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतारमधील फुटबॉल स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी 29 दिवसांचा कालावधी लागणार आणि एकूण 64 सामने होणार आहेत. तर 2026 मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी 32 दिवसांचा कालावधी लागणार आहे आणि 80 सामने होती असं बोललं जात आहे. जर एका ग्रुपमध्ये चार संघ खेळवण्याचा विचार झाला तर हे गणित थोडं बदलेल एकूण 104 सामने होतील आणि एका आठवड्यानं आयोजन वाढेल. 


सध्याचं भारतीय क्वालिफायचं गणित


2022 वर्ल्डकप स्पर्धेत आशियातील 4.5 संघाना स्थान देण्यात आलं आहे. चार संघ थेट क्वालिफाय केलं. तर एका संघाला दक्षिण अमेरिकेतील संघाशी सामना करून स्थान मिळवावं लागतं. आशिया फुटबॉल संघातील 46 संघांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सामने होतात. त्यानंतर टॉप चार संघांना वर्ल्डकपमध्ये एन्ट्री मिळते. तर एका संघासाठी इंटर-कॉन्फेडेरेशन प्लेऑफ सामना खेळला जातो. 2026 मध्ये हे गणित बदलू शकतं. 7 संघाना थेट क्वालिफाय तर एका संघाला प्लेऑफ करावा लागू शकतं.


बातमी वाचा- FIFA WC 2022: फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपतो? Video पाहा आणि समजून घ्या


  • पहिली फेरी- पहिल्या फेरीत आशिया फुटबॉल रॅकिंगमधील 35 पासून पुढे 46 पर्यंत असलेल्या 12 संघांमध्ये सामने होतात. एक संघ दुसऱ्या टीमसोबत 2-2 (होम आणि अवे) सामने खेळतो. टॉप 6 संघांना दुसऱ्या फेरीत स्थान मिळतं.

  • दुसरी फेरी- 1 ते 34  रॅकिंगमधील एकूण 34 संघ आणि पहिल्या फेरीतील क्वालिफाय झालेल्या 6 संघ दुसऱ्या फेरीत खेळतात. म्हणजेच एकूण 40 संघ दुसऱ्या फेरीत खेळतात. 40 संघांची आठ गटात विभागणी केली जाते. प्रत्येक संघ आपल्या गटात 2-2 मॅच (होम आणि अवे) खेळते. प्रत्येक गटातील टॉपच्या आठ संघ आणि संपूर्ण गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या टॉप चार संघांना तिसऱ्या फेरीत स्थान मिळतं. म्हणजेच 8 + 4= 12 संघ तिसऱ्या फेरीत जातात.

  • तिसरी फेरी- तिसऱ्या फेरीत 6-6 असे दोन गट केले जातात .या गटातही प्रत्येकत संघ 2-2 मॅच (होम आणि अवे) खेळते. दोन्ही गटातील टॉप दोन संघ वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करतात. तर दोन्ही गटातील तिसऱ्या क्रमांकाची टीम चौथ्या फेरीसाठी खेळतात.

  • चौथी फेरी- चौथ्या फेरीत दोन संघांमध्ये एक सामना होतो. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला टीम इंटर कॉन्फेडेरेशन अंतर्गत क्वालिफाय केलं जातं.

  • पाचवी फेरी- आता टीम इंटर कॉन्फेडेरेशनमध्ये क्वालिफाय झालेला संघ दक्षिण अमेरिकेतील प्लेऑफ संघासोबत सामना खेळतो. त्यातील विजयी संघाला वर्ल्डकपचं तिकीट मिळतं.