Rohit Sharma Twitter | `हिटमॅन` रोहित शर्माचं ट्विटर अकाऊंट हॅक? नेटीझन्स संभ्रमात
रोहित शर्माचं (Rohit Sharma Twitter) ट्विटर (Twitter) अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social Media) रंगली आहे.
मुंबई : टीम इंडियाने टी 20 सीरिजनंतर आता श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कंबर कसली आहे. या कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होतेय. या सीरिजपासन रोहितच्या कॅप्टन्सीच्या इनिंगला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच रोहित दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रोहित शर्माचं (Rohit Sharma) ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (team india captain hitman rohit sharma twitter account are hacked or not netizens confused due to some twittes)
रोहितचं ट्विटर हॅक
रोहितच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही तासांमध्ये अनेक ट्विट केले गेले आहेत, ज्यामुळे त्याचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
रोहित अनेक ट्विट हे आयफोनद्वारे करतो. मात्र गेल्या काही तासांमधील ट्विट हे ट्विट डेकद्वारे केले गेले आहेत. त्यामुळे रोहितचं अकाऊंट हॅक झाल्याच्या शक्यतेला आणखी हवा मिळतेय.
काय ट्विट केलंय?
रोहितच्या या अकाऊंटवरुन गेल्या काही तासांमध्ये 3 ट्विट करण्यात आले आहेत. "मला टॉस उडवायला फार आवडतं, जेव्हा तो टॉससाठी उडवलेला कॉईन पोटावर येऊन पडतो" आणि "क्रिकेट बॉल खाण्यासाठी योग्य असतात, बरोबर ना" असे ट्विट रोहितच्या अकाऊंटवरुन करण्यात आले आहेत.
दरम्यान या ट्विटमुळे नेटीझन्स आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालं आहे. दरम्यान रोहितचं अकाऊंट हे खरच हॅक झालंय की हे ट्विट स्वत: रोहितच करतोय, हे लवकरच स्पष्ट होईल.