मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे. भारताने चांगली धावसंख्या उभारून सुद्धा दक्षिण आफ्रिकेचा पराभव करता आला नाही. त्यामुळे भारतासाठी ही निराशाजनक कामगिरी ठरली होती. मात्र या घटनेसह कर्णधार ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी मैदानातच भिडल्याची घटना घडलीय.  या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे दोन विकेट्स पडल्यानंतर ऋषभ पंत बॅटींगसाठी मैदानात उतरला होता. मात्र, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात पंत 'डायमंड डक'चा बळीचा शिकार होता होता वाचला. 'डायमंड डक'चा शिकार टाळण्यासाठी त्याने आफ्रिकन खेळाडूंशी भिडल्याचेही दिसून आले. मात्र तो थोडक्यात वाचला. आणि ऋषभ पंतने 16 चेंडूंचा सामना करत 29 धावांची खेळी केली. या दरम्यान पंतने 2 षटकार आणि तेवढेच चौकारही लगावले. पंतचा स्ट्राइक रेट 181.25 होता.


'डायमंड डक'चा शिकार ? 
भारतीय डावाच्या 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक घटना घडली. ऋषभ पंत नवा खेळाडू म्हणून मैदानात आला आणि एकही चेंडू न खेळता नॉन स्ट्राईकवर उभा होता. त्यानंतर कागिसो रबाडाच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने बचाव केला. यावेळी पंत एका धावेसाठी धावत सुटला आणि अर्ध्या क्रीजवर येऊन पोहोचला. मग अय्यरने नकार दिला आणि माघारी परतायला सुरुवात केली, तेव्हा पंत प्रथम गोलंदाज रबाडाशी भिडला. आणि पंतच्या बाजूलाच उभ्या असलेल्या खेळाडूच्या हातात बॉल गेला. हा खेळाडू विकेटवर बॉल मारताच, पंतने मागे पळत क्रिस गाठण्याचा प्रयत्न केला,आणि यात तो रनआऊट होण्यापासून वाचला. यावेळी तो आफ्रिकेच्या दुसऱ्या खेळाडूला सुद्धा भिडला. अशाप्रकारे डायमंड डक पासून वाचण्यासाठी तो दोन खेळाडूंशी भिडला. जेव्हा एखादा फलंदाज एकही चेंडू न खेळता आणि धावा न करता बाद होतो, तेव्हा त्याला डायमंड डकचा बळी म्हणतात.



नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या होत्या. इशान किशनने 48 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 गडी गमावून 19.1 षटकात 212 धावा केल्या आणि सामना 7 विकेटने सामना जिंकला.ऋषभ पंतने पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व केले. मात्र तो त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.