मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अनेक बदल करण्यात आले आहेत. टी 20 पाठोपाठ आता विराट कोहलीकडून वन डेचं कर्णधारपदही काढण्यात आलं. दुसरीकडे अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची नुकतीच टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतकच नाही तर वन डेचा कर्णधार म्हणूनही त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे एकाच दिवशी दोन मोठे निर्णय घेतल्याचं पाहता BCCI विराट कोहलीवर नाराज असल्याचं दिसत आहे. 


आगामी काळात कसोटीचे कर्णधारपदही विराटकडून हिसकावले जाण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयने एक खेळाडू तयार केला आहे. येत्या काळात याचीही घोषणा केली जाऊ शकते असा कयास आहे.


नवा कसोटी कर्णधार हा रोहित शर्मा असेल असा कयास आहे. बीसीसीआयने नुकतीच रोहितवर मोठी जबाबदारी दिली. आता विराटनंतर कसोटी कर्णधार होण्याइतपत संघातील अन्य कोणताही खेळाडू नाही. 


त्यामुळेच रोहितलाही नवा कसोटी कर्णधार म्हणून नेमला जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात कसोटीतील आव्हानांसाठी सज्ज राहावे यासाठी त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


दुसरीकडे अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटची संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यात जर रहाणे आपली चांगली कामगिरी दाखवू शकला नाही तर मात्र त्याची कसोटी कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता आहे.