माउंट मौंगानुई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने सर्व सामन्यात विजय मिळत फायनलमध्ये धडक मारली आहे. या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया देखील फक्त भारताकडून पराभूत झाली आहे. पहिला सामना दोघांनी एकमेकांविरोधात खेळला आणि अंतिम सामन्यात देखील पुन्हा ते एकमेकांसमोर खेळत आहेत.


चौथ्यांदा इतिहास रचणार टीम इंडिया


ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारतीय टीम फेव्हरेट मानली जात आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला कर भारत चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकणारा संघ ठरणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ देखील ही संधी जाऊ देणार नाही. कर्णधार पृथ्वी श़ॉ सोबतच उपकर्णधार शुभमन गिलने देखील चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल सर्वात यशस्वी बॅट्समन ठरला आहे.