नुसतं क्रिकेट एके क्रिकेट; IPL नंतरही टीम इंडियाला आराम नाहीच
आयपीएलच्या 10 दिवसानंतर तातडीने टीम इंडिया एक सिरीज खेळणार आहे.
मुंबई : इंडियन प्रिमियर लीगचा थरार 26 मार्चपासून पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलचा 15 वा सिझन हा 29 मे पर्यंत सुरु राहणार आहे. महिनाभर सुरु राहण्याऱ्या या आयपीएलमुळे टीम इंडियाचे प्लेयर्सची पुरती दमछाक होणार आहे. दरम्यान या नंतरही टीम इंडियाला आराम मिळणार नाहीये. कारण आयपीएलच्या 10 दिवसानंतर तातडीने टीम इंडिया एक सिरीज खेळणार आहे.
जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 5 टी 20 सामने सिरीज खेळायची आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे आयसीसीच्या शेड्यूडला हिस्सा आहे. हे पहिल्यापासूनच ठरलं होतं.
आयपीएलनंतर टीम इंडियाचं टाईट शेड्यूल
आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेची सिरीज सुरु होणार आहे. यामधील पहिला सामना 9 जूनपासून सुरु होणार आहे. तर शेवटचा सिनेमा हा 19 जून रोजी होणार आहे. यानंतर टीम इंडिया आयरलँड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयरलँडच्या विरूद्ध 26 आणि 28 जून दोन टी-20 सिरीज असणार आहेत. त्यानंतर 7 जुलैला इंग्लंडविरूद्धची सिरीज सुरु होणार आहे.
मॅच तारीख जागा
1 9 जून चेन्नई
2 12 जून बंगळूरु
3 14 जून नागपूर
4 17 जून राजकोट
5 19 जून दिल्ली