हसून हसून पोट दुखेल, 31 वर्षांपूर्वी गोविंदाच्या 'या' कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास

अभिनेता गोविंदा आज जरी चित्रपटांपासून दूर असला तरी एक काळ असा होता की त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरले होते. 

| Dec 29, 2024, 15:28 PM IST
1/7

अभिनेता गोविंदा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. परंतु, त्याचे जुने अनेक चित्रपट आज देखील पाहताना लोकांना कंटाळा येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कॉमेडी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.   

2/7

हिट चित्रपट

80 आणि 90 च्या दशकामध्ये गोविंदाला बॉक्स ऑफिसचा बादशहा म्हटले जात होते. गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 

3/7

ब्लॉकबस्टर

गोविंदाचा एक चित्रपट फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 

4/7

गोविंदाचा हिट चित्रपट

हा चित्रपट गोविंदाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले होते. या चित्रपटात चंकी पांडे, रितू शिवपुरी, रागेश्वरी, शिल्पा शिरोडकर, बिंदू आणि शक्ती कपूर हे कलाकार होते. 

5/7

सर्वाधिक कमाई

कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड करून वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्याचे नाव 'आँखें' आहे.   

6/7

बन्नू आणि मुन्नू

या चित्रपटाची कथा बन्नू आणि मुन्नू या दोन भावांभोवती फिरते. जे खूप आळशी असल्यामुळे त्यांना घराबाहेर काढलेले असते. चित्रपटात गोविंदा आणि कादर खान यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. 

7/7

दुहेरी भूमिका

दुहेरी भूमिका आणि कॉमेडीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला. या चित्रपटाने फक्त गोविंदालाच नाही तर चंकी पांडे यांना देखील खूप प्रसिद्धी मिळवून दिली.