मुंबई : टी-२० सीरीजमध्ये न्यूझीलंडचा ५-० ने पराभव केल्यानंतर आता टीम इंडिया वनडे आणि टेस्ट सीरीजसाठी सज्ज झाली आहे. पण त्याआधी भारतीय क्रिकेट टीमला एक झटका लागला आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे टीमच्या बाहेर झाला आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडच्या विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतीय ओपनर रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवालला वनडेमध्ये आणि शुभमन गिलला टेस्टमध्ये संधी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा टी-२० सीरीजच्या शेवटच्या सामन्यात पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा वनडे आणि टेस्ट सीरीजमधून बाहेर झाला आहे. रोहित बाहेर झाल्यामुळे पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल हे वनडेमध्ये ओपनिंगला खेळतील. शिखर धवन हा याआधीच दुखापतीमुळे भारतीय टीमबाहेर आहे. 


केएल राहुलला टेस्ट सीरीजमध्ये घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे टेस्ट सीरिजमध्येही पृथ्वी शॉ आणि मयांक ओपनिंग येतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये बुधवार ५ फेब्रुवारीपासून ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजनंतर २ टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. 


भारतीय टेस्ट टीम 


विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा.


भारतीय वनडे टीम


विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केदार जाधव