मुंबई: देशात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव घेत नाही आहे. भारतीय संघातील फास्ट बॉलरला देखील कोरोनाची लक्षण आढळली आहेत. या बॉलरच्या आईची प्रकृती बिघडल्यानं कोरोनावरचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टीम इंडिया ज्येष्ठ बॉलर भुवनेश्वर कुमारच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुवनेश्वर कुमार आणि त्यांची पत्नी नुपूर यांनाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. दोघांनीही आपले स्वॅब चाचणीसाठी दिले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. भुवनेश्वर आणि त्याच्या पत्नीने मेरठमधील आपल्या घरी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. 


भुवनेश्वर कुमारचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. भुवनेश्वर कुमार जुलै महिन्यात टीम B सोबत श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. 


श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा झालेली नसली तरी भुवनेश्वर त्या संघाचा महत्त्वाचा भाग असेल. जर भुवनेश्वर तंदुरुस्त नसेल तर टीम इंडियाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. 


भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरूद्धच मालिकेतून वन डे आणि टी -20 क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. तो बराच काळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याने IPLच्या सामन्यांमधून देखील दुखापतीमुळे ब्रेक घेतला होता. आता भुवनेश्वर कुमारच्या कोरोना रिपोर्टकडे टीम इंडियाचं आणि BCCIचं लक्ष असणार आहे.