Cricket News : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाला कसोटी आणि एकदिवस क्रिकेट मालिकेत वाईट पराभवाला सामोरं जावं होतं. या पराभवानंतर भारतीय निवड समितीने संघात सातत्याने फेरबदल करत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर अनेक नव्या खेळाडूंची संघात एन्ट्री झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपणार 
संघात नव्याने दाखल झालेल्या युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. अशात भारताचा स्टार गोलंदाज ईशांत शर्माकडे मात्र निवड समितीचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे त्याची क्रिकेट कारकिर्द जवळपास संपल्यात जमा आहे. 


दक्षिण आफ्रिका दौऱ्या ईशांत शर्माला एकाही कसोटी सामन्यात संधी देण्यात आली नाही. निवड समितीने ईशांत शर्माला पहिली पसंती कधीच दिली नव्हती. संघातील मुख्य गोलंदाज जखमी झाल्यावरच त्याला संघात संधी मिळत होती. 



या पाच गोलंदाजांना पसंती
भारतीय क्रिकेट संघात सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे अव्वल गोलंदाजांमध्ये अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर शार्दुल ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि उमेश यादव पाचव्या पसंतीचा गोलंदाज आहे.   


जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर निवड समितीचा सध्या भरोसा आहे. बुमराह-शमीची जोडी सुपरहिट असून सध्यातरी त्यांना कोणीही संघाबाहेर टाकू शकत नाही. दुसरीकडे, सिराजही गेल्या वर्षभरात संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. सिराजने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली होती. त्याचबरोबर उमेश यादवला चौथा गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. 


भारतीय संघात बदलाचं यूग
खराब फॉर्ममध्ये असलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासमोर संघात परतण्याच मार्ग खूप खडतर आहे. ईशांत शर्मालाही भारतीय क्रिकेट संघापासून लांब ठेवलं जात आहे. त्यामुळे भारतीय कसोटीत बदलाचे युग सुरू झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


दिल्लीचा 33 वर्षीय इशांत सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने 105 कसोटी सामन्यांमध्ये 311 विकेट घेतल्या आहेत. मात्र इंग्लंड दौऱ्यापासून खराब फॉर्मशी झगडतोय.


वेगवान गोलंदाजांसाठी वय हा देखील एक मोठा घटक आहे. सिराज आणि बुमराहसारखे गोलंदाज अजूनही तरुण आहेत. त्याची कारकीर्द दीर्घ आहे. त्यामुळे ईशांत शर्माला भारतीय संघात पुन्हा संधी मिळणं सध्यातरी कठिण दिसतंय.