Team India: प्रत्येक क्रिकेटरचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न असतं. अनेक क्रिकटर्सना संघात स्थानही मिळतं पण आपलं स्थान टिकवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. असेच काही भारतीय खेळाडू (Indian Cricketers) आहेत ज्यांना टीम इंडियात (Team India) स्थान मिळालं, पण अल्पावधीतच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.  यातल्या काही खेळाडूंनी तर क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्रिकेटपटूंची क्रिकेटमधली कारकिर्द फ्लॉप ठरली असली तरी त्यांच्या जोडीदाराच्या बाबतमीत मात्र ते टॉप आहेत. त्यांच्या पत्नीचे फोटो बॉलीवूड अभिनेत्रीलाही मागे टाकतील असे आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे लाखोने फॉलोअर्स आहेत. 


1. मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय
मनोज तिवारीची (Manoj Tiwari) पत्नी सुष्मिता रॉय ही आपल्या सुंदरतेमुळे आणि स्टाइलिश लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फॅन्समध्येही ती चांगलीच लोकप्रिय आहे. सुष्मिता रॉयचं फोटोशूट चांगलेच चर्चेत असतं आणि त्याला फॅन्सची चांगली पसंतीही मिळते. मनोज तिवारी टीम इंडियासाठी 12 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळला आहे. 12 वन डेत त्याने भारतासाटी 26.1 च्या रनरेटने 287 धावा केल्या आहेत. तर 3 टी-20 सामन्यात केवळ 15 धावा केल्या आहेत. 



2. अशोक डिंडाची पत्नी श्रेयासी रुद्रा
अशोक डिंडाची (Ashok Dinda) पत्नी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी सुंदर आहे. श्रेयासी रुद्राचा जन्म बंगाली कुटुंबात 30 मे 1987 साली झाला. शेयासीने इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून ती एका एमएनसी कंपनीत इंजिनिअरिंग पदावर नोकरी करते. श्रेयासी आपला लूक आणि फिटनेसच्या बाबतीत चांगलीच सजग असते. अशोक डिंडा भारतीय संघासाठी 13 वन डे आणि 9 टी-20 सामने खेळाला आहे. वन डेत त्याने केवळ 12 विकेट घेतल्या आहेत. 



3. परविंदर अवानाची पत्नी संगीता कसाना
परविंदर अवानाची (Parvindar Awana) पत्नी पोलीस अधिकारी आहे. परविंदर आणि संगीता कसानाचं लग्न 2018 मध्ये झालं. संगीता कसाना ही सुंदरतेच्या बाबतीत जराही कमी नाही. ती सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नाही. परविंदर अवानाचा टीम इंडियामधला प्रवास खूपच अल्प राहिला आहे. भारतासाठी तो केवळ दोन टी-20 सामने खेळला आहे, आणि यात त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.



4. विनय कुमारची पत्नी रिचा सिंह
रणजी क्रिकेटमध्ये आपल्या नेतृत्वाखाली कर्नाटक संघाला दोन वेळा रणजी ट्रॉफी जिंकून देणारा विनय कुमार (Vinay Kumar) भारतीय क्रिकेटसाठी मोठी कामगिरी करु शकला नाही. विनय कुमारची पत्नी रिचा सिंह पुरी खुपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस आहे. रिचा बंगलोरमधल्या इंटेग्रिटी स्पोर्टस कंपनीची डायरेक्टर आहे. यासोबतच तिला लिखाण आणि फॅशन डिजाईनिंगचीही आवड आहे.



5. स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लेंगर
स्टुअर्ट बिन्नीची (Stuart Binni) पत्नी मयांती लँगर स्पोर्ट्स अँकर म्हणून प्रसिद्ध आहे. स्पोर्ट्स चॅनलमध्ये समालोचनाबरोबरच क्रिकेटर्सच्या मुलाखाती घेतानाही ती अनेकवेळा पाहिला मिळते. 2012 मध्ये स्टुअर्ट आणि मयांती लँगरचं लग्न झालं.