मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामने सुरू आहेत. याच दरम्यान वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामने कसोटी सीरिजनंतर खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाला मोठा धक्का हा आहे की रोहित शर्मा या वन डे सीरिजमधून बाहेर असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा पहिल्यांदा कर्णधार म्हणून खेळणार होता. मात्र दुखापतीमुळे तो खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे. तर रोहितच्या अनुपस्थितीमध्ये विराट कोहलीकडे नाही तर दुसऱ्याच खेळाडूच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. 


रोहित शर्मा आपल्या दुखापतीमधून अजून पूर्णपणे बरा झाला नाही. त्यामुळे टीम इंडियाला आणखी एक नवा तात्पुरता कर्णधार मिळाला आहे. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये के एल राहुल कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. के एल राहुलला वन डे सीरिजसाठी तूर्तास कर्णधार करण्यात आलं आहे. 


वन डे सीरिजमध्ये ओपनिंगसाठी शिखर धवन मैदानात उतरेल अशी माहिती मिळाली आहे. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात जागा देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपद जसप्रीत बुमराह सांभाळणार आहे.


केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) , भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.