मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी बुधवारी 8 सप्टेंबरला 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेला सौरव गांगुलीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. टीम इंडियाचा 'दादा' असलेला सौरव गांगुलीच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे. याबाबतची माहिती स्वत: गांगुलीने ट्विट करत दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना गांगुलीची क्रिकेट कारकिर्द या जीवनपटाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. (team india former captain sourav ganguly announce his biopic via tweet) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गांगुलीने ट्विटमध्ये काय म्हंटलंय? 


"क्रिकेट माझं जीवन आहे. मी आज जो काही आहे ते क्रिकेटमुळेच. क्रिकेटने मला आत्मविश्वास दिला. आता लवकरच माझ्या जीवनावरील सिनेमा लव फिल्मस आणणार आहे. या निमित्ताने माझं आयुष्य हे मोठ्या स्क्रीनवर येईल", असं गांगुलीने ट्विटमध्ये म्हंटलंय. दरम्यान या बायोपिकमध्ये गांगुलीची भूमिका कोण साकारणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. 


आतापर्यंत या क्रिकेटपटूंवर बायोपिक


दरम्यान गांगुलीच्या आधी अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर बायोपिक करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर  'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' जीवनपट करण्यात आला. यामध्ये सुशांतसिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. हा बायोपिक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन- अ बिलियन ड्रिम्स' माहितीपट केला होता. टीम इंडियाने कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपचा थरारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.