मुंबई : टीम इंडियामध्ये (Team India) रोहित शर्मा पर्वाची जोरदार सुरुवात झाली आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वनडे, टी 20 आणि टेस्ट टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्मा टेस्टचा टीमचा कॅप्टन होताच भारतीय संघाचं नशीब बदललं आहे. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (team india have benifit in icc ranking due to south africa beat new zealand)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच न खेळताच कॅप्टन रोहितने नशिब पालटलं


टीम इंडिया जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात आफ्रिकेने टीम इंडियाचा 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा पराभव स्वीकारावा लागला होता. विराटने या नंतर कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. 


टीम इंडियाची या पराभवानंतर टेस्ट रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र आता रोहित कॅप्टन होताच टीम इंडियाचं नशिब पालटलं आहे.  


कर्णधार झाल्यानंतर एकही सामना न खेळता रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टेस्ट रॅकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे.


टीम इंडियाला नेमका कसा फायदा? 


रोहितने कॅप्टन म्हणून एकही टेस्ट न खेळता टीम इंडियाला कसा फायदा झाला, असा सवाल तुम्हाला पडला असेल. तर याबाबतही आपण जाणून घेऊयात.


दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट मॅच खेळवण्यात आली. या सामन्यात आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत केलं. याचा फायदा टीम इंडियाला झाला.   


आफ्रिकेने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केल्याने टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. मात्र न्यूझीलंड आणि आणि टीम इंडियात फक्त 1 पॉइंटचा फरक होता.


आफ्रिकेने तिथे न्यूझीलंडचा पराभव झाल्याने टीम इंडिया आपोआप दुसऱ्या स्थानावर पोहचली. 


या 2 मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये न्यूझीलंडने विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे न्यूझीलंडला 1 पॉइंट मिळाला. मात्र दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. 


त्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यातून 2 पॉइंट्स कापण्यात आले. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये अवघ्या पॉइंट 1 चा फरक होता. आफ्रिकेने न्यूझीलंडला पाणी पाजलं आणि टीम इंडिया नंबर 1 झाली.


आयसीसीने अखेरची टेस्ट रॅंकिग 19 जानेवारी 2022 ला प्रसिद्ध केली होती. त्यानुसार टीम इंडियाचे पॉइंट्स हे 116 होते.  मात्र टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये 500 पेक्षा अधिक रेटिंग्स पॉइंट्सचं अंतर आहे.


आयसीसी आता लवकरच टेस्ट रॅंकिंग जाहीर करणार आहे. यामध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानी असेल.