मुंबई : टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या मोसमात टीम इंडिया घरच्या मैदानात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी भिडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोसमामध्ये टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे आणि तीन टी20 ची सीरिज खेळेल. न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी20 ची सीरिज खेळवण्यात येईल.


यातल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सप्टेंबरपासून सुरुवात होईल. चेन्नई, बंगळुरू, नागपूर, इंदूर आणि कोलकत्यामध्ये या पाच वनडे खेळवण्यात येतील तर हैदराबाद, रांची आणि गुवाहाटीमध्ये टी20 खेळवल्या जातील.


ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येईल त्यावेळी पुणे, मुंबई आणि कानपूरमध्ये वनडे खेळवल्या जातील तर दिल्ली, कटक आणि राजकोटमध्ये टी-20 खेळवल्या जातील.


नोव्हेंबरमध्ये श्रीलंका कोलकाता, नागपूर आणि दिल्लीत टेस्ट खेळेल यानंतर धर्मशाला, मोहाली आणि विशाखापट्टणममध्ये वनडे सीरिज होईल. मग कोची किंवा तिरुअनंतपुरम, इंदूर आणि मुंबईत टी-20 मॅच होतील.