Team India For T20 World Cup: भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह 2022 च्या T20 विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू (Rohan Gavaskar) यांना विश्वास बसत नाही की जसप्रीत बुमराहची T20 विश्वचषक स्पर्धेतील संभाव्य अनुपस्थिती हा तोटाच म्हणता येईल, कारण रोहित शर्मा  (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील संघाने तो नसताना अनेक T20 स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांसोबत काही आगामी योजना आखण्यात आल्या होत्या.


 गावस्करने म्हटले की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पोर्ट्स 18 वरील 'स्पोर्ट्स ओव्हर द टॉप' या शोमध्ये रोहन गावस्कर म्हणाला, 'तुम्ही जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकत नाही आणि तो संघासाठी काय करतो हे सर्वांना माहीत आहे. जसप्रीत बुमराह कोणत्याही संघात असला की त्याचा फायदा होतो, मग तो जगातील कोणताही संघ असो.


गेल्यावर्षी कमी खेळले T20 सामने


रोहन गावस्कर पुढे म्हणाला, 'म्हणून, भारताचा फायदा नक्कीच चुकला आहे, हे निश्चित आहे, पण तोटा आहे का? मला खात्री नाही की तुम्ही याला तोटा म्हणू शकता, कारण गेल्यावर्षी जसप्रीत बुमराहने किती T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे मला वाटते की भारतीय संघाला त्याच्याशिवाय खेळण्याची सवय झाली आहे आणि त्यांनी त्यानुसार नियोजन केले आहे.


बुमराहशिवाय वेस्ट इंडिज दौऱ्यावर ही मालिका जिंकली  


जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी जिंकली. कारण त्याने बुमराहशिवाय कॅरेबियनमध्ये वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या. गेल्या काही सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी टीम इंडियासाठी खूपच खराब झाली आहे. टीम इंडियाचे सर्व गोलंदाज 19 व्या षटकात धावा लुटत आहेत.