IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवण्यात आली. या टेस्ट सीरिजचा शेवटचा आणि निर्णायक सिडनी टेस्ट सामना 3 जानेवारी पासून सुरु होता. मात्र या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने दणदणीत विजय झाला असून त्यांनी 3-1 अशी आघाडी घेऊन सीरिज जिंकली आहे. तर टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली असून तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहने केलं होतं. बुमराहने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 185 धावा केल्या. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अपहील्या इनिंगमध्ये 181 धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मोठं आव्हान देण्याकरता फलंदाजीसाठी उतरली खरी मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अटॅक समोर 157 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. 


भारताने 10 वर्षांनी गमावली बॉर्डर गावसकर ट्रॉफी : 
 


टीम इंडिया मागील 10 वर्षांपासून सलग बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकत आली आहे. 2014 - 15 मध्ये ऑस्ट्रेलियाने चार सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज जिंकली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 2-0 ने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर वर्ष 2016 -17, 2018 -19, 2020 -21, 2022 -23 अशा चारही वेळा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये 3-1 ने पराभव केला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्टमध्ये बाजी मारून 10 वर्षांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी नावावर केली आहे. 


टीम इंडिया WTC फायनलमधून बाहेर 


2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकणं अत्यंत महत्वाचं होतं. मात्र आता सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची टेस्ट सीरिज 3-1 ने जिंकल्यामुळे आता साऊथ आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये क्वालिफाय झाली आहे.