मुंबई : आयपीएलचा (IPL 2021) चौदावा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. आता प्लेऑफची चुरस सुरु होईल. पण जसजसं आयपीएल शेवटच्या टप्प्यात पोहचतंय तससशी क्रिकेट प्रेमींमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषकाची (ICC T20 World Cup 2021) उत्सुकता वाढू लागली आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या नेतृत्ताखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीकडे लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर त्यांना आणखी एका गोष्टीची उत्सुकता आहे, ती म्हणजे टी-20 विश्वचषकात भारतीय टीम कोणत्या जर्सीमध्ये खेळणार.


नव्या जर्सीची लवकरच घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट प्रेमींची ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या ट्विवटर अकाऊंडवर घोषणा केली आहे. येत्या 13 ऑक्टोबरला टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली जाणार आहे. विराट आर्मी या नव्या जर्सीत टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) खेळताना दिसणार आहे. 



पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना


आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला येत्या 14 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) रंगणार आहे. 


नव्या जर्सीत काय असणार विशेष?


भारतीय टीम सध्या एकदिवसीय सामन्यासाठी नेव्ही ब्ल्यू रंगाच्या रेट्रो जर्सीत खेळत आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून टीम इंडियाचे खेळाडू या जर्सीत दिसत आहेत. भारतीय क्रिेकेट प्रेमींनीही या जर्सीला पसंती दिली आहे. पण आता काही दिवसातच स्पष्ट होईल नव्या जर्सीत काय विशेष असणार आहे.


टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी


स्टँडबाय : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर
प्रशिक्षक : रवि शास्त्री 
मेंटर : एमएस धोनी


टी20 विश्वचषकात भारताचे सामने


भारत vs पाकिस्तान - 24 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs न्यूजीलैंड- 31 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs अफगाणिस्तान- 03 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबू धाबी
भारत vs बी1- 05 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs ए2- 08 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
सेमीफाइनल 1- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबू धाबी
सेमीफाइनल 2- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
फाइनल- 14 नवंबर, 7:30 PM IST, दुबई.