मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) याने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनला. कोहलीने अचानकपणे कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर, रोहित शर्मा कसोटीच्या कर्णधारपदासाठी योग्य नसल्याने बीसीसीआय कसोटीचा नवा कर्णधार कोणाला करायचा या विचारात मग्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू भारताचा नवा कसोटी कर्णधार


कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर असा एक खेळाडू आहे जो विराट कोहलीच्या जागी नवीन कसोटी कर्णधारपदासाठी योग्य आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा एकमेव स्टार खेळाडू आहे जो नवा कसोटी कर्णधार (New Test Captain) होण्याचा दावेदार आहे. केपटाऊनच्या अवघड खेळपट्टीवर गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने दाखवून दिले होते की तो वेगळ्या मातीचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतची आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. ऋषभ पंतची ही शैली चाहत्यांना आवडली, त्यानंतर त्याला कसोटीचा नवा कर्णधार बनवण्याची मागणी होत होती.


रोहित शर्मा आता 34 वर्षांचा आहे. बीसीसीआय जर भविष्याचा विचार करत असेल, तर त्याला कसोटी कर्णधार बनवण्याबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत 24 वर्षीय ऋषभ पंतला कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद मिळू शकते. विराट कोहलीला वयाच्या 27 व्या वर्षी कसोटीचे कर्णधारपद मिळाले, तर वयाच्या 29 व्या वर्षी त्याला वनडे आणि टी-20 चे नेतृत्व मिळाले.


विराट कोहलीला त्याच्या कर्णधारपदाचा आनंद घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंतला नवा कर्णधार म्हणून तयार करणे हे बीसीसीआयचे लक्ष्य असेल. भारताला नवा कर्णधार बनवायचा असेल तर ऋषभ पंत हा चांगला पर्याय आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटले होते की, ऋषभ पंतने अलीकडच्या काळात खूप प्रभावित केले आहे आणि आता त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद दिले पाहिजे. गावस्कर यांनी मन्सूर अली खान पतौडी यांचे उदाहरण देत पंत यासाठी तयार असल्याचे सांगितले. सुनील गावसकर म्हणाले की, पतौडी यांना अगदी लहान वयात कर्णधार बनवण्यात आले होते आणि त्यांनी खूप यश मिळवले होते, तसेच पंतलाही शक्य आहे.'